Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूरच्या ‘सवंगडी व्हाटसअ‍ॅप ग्रुप’ची मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत

पहूर, ता. जामनेर रविंद्र लाठे । येथील आर. टी. लेले हायस्कूलच्या १९९० च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सवंगडी व्हाटसअ‍ॅप ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २७ हजार रूपयांची मदत केली असून त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

पहूर येथील आर. टी. लेले हायस्कूल च्या १९९० च्या दहावी च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत संवगडी नावाने व्हाट्सएप गृप बनवून प्रथम माजी विद्यार्थ्यांचा मेळावा घेऊन शिक्षकांचा सन्मान केला. यावर न थांबता परभणी जिल्ह्यातील शाहिद जवान शुभम मुस्तापुरे यांच्याय कुटुंबा ला ४५हजाराचा निधी थेट घरी जाऊन दिला. यानंतर कोल्हापुर येथील महापुरात बाधित झालेल्या कुटुंबा साठी राजश्री शाहू महाराज सामाजिक संस्थेला तीस हजाराची औषधी संकलित करून कोल्हापुर येथे पाठविन्यात आली होती.

आज संपूर्ण देशावर कोविड-१९ विषाणूच्या संसर्गाने पूर्ण देश लॉक डाऊन घोषित केल्याने हातावर पोट असलेल्यांचे हाल होत असल्याचे पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलेल्या अवहानाला साथ देत संवगडी गृप ने मागे न राहता सत्तावीस हजाराचा निधी जमा करून तलाठी राठोड यांच्या कडे सुपुर्द केला. यावेळी गृप एडमिन शरद वैजिनाथ पांढरे यांनी आम्ही जामनेर येथे जाऊन तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या कडे धनादेश देणार होतो परंतु आधीच लॉक डाऊन घोषित असल्याने त्यातच जमाव बंदी आदेश असल्याने आम्ही तलाठी एस. एस.राठोड यांच्या कड़ेच धनादेश सुपुर्द केल्याचे सांगितले. यावेळी पहूर सह परिसरातून संवगडी ग्रुप चे सर्व थरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Exit mobile version