Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहाटेच महापौरांची एलईडी पाहणी, नागरिकांशी साधला संवाद !

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात एलईडी बसविण्याचे काम सुरू असून गेल्याच आठवड्यात मोहाडी रस्त्यावर एलईडी बसविण्यात आले. रविवारी पहाटे ५ वाजताच महापौर सौ. भारती सोनवणे यांनी एलईडी सुरू आहेत की नाही याची पाहणी केली. यावेळी सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.

शहरात सध्या एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. शहराला नवीन झळाळी मिळत असून वीज बचत देखील होणार आहे. रविवारी सकाळी ६ वाजताच महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मोहाडी रोड परिसरात फेरफटका मारत पाहणी केली. सर्व एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्यावर लख्ख प्रकाश पडला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
मोहाडी रोड परिसरात सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या महिलांशी देखील महापौर सौ.भारती सोनवणे यांनी संवाद साधला. एलईडी बसविल्याने मुख्य रस्ता उजळून निघाला आहे. उजेड वाढल्याने रस्त्यावर होणाऱ्या सोनसाखळी लंपासच्या प्रकाराला आळा बसणार असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होणारे गैरप्रकार देखील रोखले जाणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, परिसरात आणि शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे मांडली. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली. रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागाचा मक्ता दिलेला असल्याची माहिती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नागरिकांना दिली.

Exit mobile version