Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जाईल ‘खेला होबे दिवस’ !

कोलकाता : वृत्तसंस्था । ज्या घोषणेमुळे भाजपाचा खेळ खल्लास झाला होता. ती ‘खेला होबे’ घोषणा लोकांनी स्विकारली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ‘खेला होबे दिवस’ साजरा करणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.

निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या घोषणा कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावण्याचे काम करतात. तसेच विरोधकांवर हल्ला करण्यासाठी घोषणा दिल्या जातात. सगळ्या पक्षांकडून घोषणांवर काम केले जाते. भाजपाचा देखील घोषणांवर मोठा हातखंडा आहे. ‘मोदी है तो मुमकिन है’, ‘काँग्रेसमुक्त भारत’, अशा अनेक घोषणा प्रचारादरम्यान कानावर पडतात. अशाच घोषणा पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान ऐकायला मिळाल्या. पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र, तृणमूल कॉंग्रेसने भाजपाचा गेम पलटवला. त्यावेळी तृणमूल काँग्रेसची एक घोषणा चर्चेत आली ती म्हणचे ‘खेला होबे’ म्हणजे खेळ होणार.

टीएमसी आणि विशेषत: ममता बॅनर्जी निवडणुकीच्या सभांमध्ये वारंवार हा नारा दिला जात होता. त्याचे लक्ष्य थेट भाजपकडे होते. या निवडणुकीच्या घोषणेने टीएमसीच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

टीएमसीची निवडणूक घोषणा केवळ ‘खेला होबे’ नव्हे तर यासह ममता बॅनर्जी यांनी दिलेलेली आणखी एक घोषणा होती, ‘खेला होबे, देखा होबे, जेता होबे’ म्हणजे खेळा, पहा आणि जिंकू. या व्यतिरिक्त ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्री राम’ च्या घोषणेला उत्तर म्हणून ‘हरे कृष्णा हरे राम, विदा हो बीजेपी-वाम’ अशी घोषणा दिली होती.

 

Exit mobile version