Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवार साहेबांवर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना सात जन्म घ्यावे लागतील : मुंडे

dhananjaymunde k2mH 621x414@LiveMint

 

पुणे (वृत्तसंस्था) पवार साहेबांवर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना सात जन्म घ्यावे लागतील तरीही ती पूर्ण होणार नाही, असा टोला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजाप प्रदेक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हाणला आहे. दोन दिवसांपुर्वी चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर पीएचडी करायची असल्याचे खोचकपणे म्हटले होते.

 

पुण्यातील बार्टी संस्थेला धनंजय मुंडे यांनी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शनिवारी भेट दिली. यावेळी मुंडे म्हणाले, भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही हे वारंवार समोर आले असून त्यासाठी ते कुठल्या थराला जाऊ शकते हे सर्व जनतेनी पाहिलं आहे. त्यामुळे मध्यावधीची जी अफवा भाजप पसरवतेय त्याला काही अर्थ नाही. तर पवार साहेबांवर पीएचडी करायला चंद्रकांत पाटलांना सात जन्म घ्यावे लागतील तरीही ती पूर्ण होणार नाही, पवार साहेबांना ओळखायला दहा जन्म घ्यावे लागतील,असा टोला मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

Exit mobile version