Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवार एक आदर्श परिवार, ‘तो’ विषय एकत्र बसून एका मिनिटात संपवतील : राजेश टोपे

जालना (वृत्तसंस्था) मी अजित पवार यांना चांगले ओळखतो, पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार, अजित पवार आणि पार्थ पवार एकत्र बसून एका मिनिटात हा विषय संपवतील. यात काहीही अडचण नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

 

जालन्यात माध्यमांशी बोलताना राजेश टोपे पुढे म्हणाले की, ते एक आदर्श घर असल्याने मुद्दा सुटायला काहीही अडचण येणार नाही. माझ्या दोन पीढ्यांचा पवार कुटुंबाशी संबंध आहे. पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या घरात एकोपाच असतो. माध्यमांनी याला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे घर आदर्श घर आहे. पार्थ पवार माझा मित्र आहे. शरद पवार त्यांना घरात बसून जे काही आहे ते सांगतात. शरद पवार ज्येष्ठत्वाच्या नात्याने अधिकाराने काही बोलले असतील तर तो त्यांच्या घरातील मुद्दा आहे. परंतू माध्यमांनी या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहनही केले.

 

Exit mobile version