Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पवन बारी ‘युवारंग’मध्ये फोटोग्राफीत तृतीय

WhatsApp Image 2020 01 23 at 1.26.15 PM

यावल, प्रतिनिधी | येथील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी पवन बारी यांने नुकत्याच शहादा जिल्हा नंदुरबार येथे जानेवारी १४ते २० पर्यंत क. ब. चौधरी उतर महाराष्ट्र विद्यापिठाअंतर्गत आयोजीत करण्यात आलेल्या युवारंग या कार्यक्रमात फोटोग्राफी या कला प्रकारात तिसरा क्रमांक पटकाविला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युवारंग २०१९-२०’ मध्ये फोटोग्राफीत कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील पवन बारी या विद्यार्थ्याने यश प्राप्त केले. याबद्दल त्याला कांस्यपदक व स्मृतीचिन्ह , सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात पवन बारी याने मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. ए. पी. पाटील, प्रा. व्ही. बी. पाटील, प्रा. अहिरराव, डॉ. एस. पी. कापडे, डॉ. सुधा खराटे, प्रा. राजू पावरा, लेखापाल किरण देशमुख यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version