Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पळासखेडे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची चौकशी करा; जिल्हा परिषदेसमोर तक्रारदाराचे आमरण उपोषण (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील पळासखेडे ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.

 

सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील पळासखेडे ग्रामपंचायतीमध्ये शौचायल योजनामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. यासंदर्भात भडगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी रमेश वाघ यांच्याकडे रीतसर कारवाई करण्याचे निवेदन दिले होते. दरम्यान जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी भडगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वाघ यांना दोन दिवसात चौकशी करून कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या परंतु गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यानुसार पळासखेडे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना सोमवारी २४ जानेवारी रोजी देवून सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरुवात केली आहे, जोपर्यंत भ्रष्टाचाराची चौकशी करून गटविकास अधिकारी यांना निलंबित करत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण होईल, अशी माहिती उपोषणकर्ते सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांनी दिले आहे.

Exit mobile version