Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पळासखेडा बुद्रुक गावातून दोन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक गावातून अज्ञात चोरट्यांनी दोन ट्रॅक्टरच्या बॅटऱ्यांची चोरी केल्याची घटना शुक्रवारी १९ मे रोजी सकाळी ८ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पळासखेडा बुद्रुक येथील रहिवाशी पुरुषोत्तम लक्ष्मण पाटील यांचा मालकीचे २ ट्रॅक्टर त्यांच्या वॉल कंपाऊंड केलेल्या खळ्यामध्ये उभे होते. गुरूवारी १८ मे रोजी मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने दोन ट्रॅक्टरवरील सुमारे १५ हजार रुपये किमतीची २ बॅटरी चोरी केली केल्याची घटना घडली. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी १९ मे रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून सागर नामदेव सोळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढले आहे. १५ दिवसांमध्ये ४ चाकीवाहन चोरीला गेले, अनेक महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत, एवढ्या वर न थांबता आता शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवरील बॅटरी चोरटे चोरी करत असून यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

Exit mobile version