Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परोपकाराचा नंदादीप सर्वांनी अखंड तेवत ठेवा — शीतल जडे

 

जळगाव : प्रतिनिधी । ” परोपकाराचा नंदादीप सर्वांनी अखंड तेवत ठेवायला पाहिजे “असे प्रतिपादन साई समीक्षा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती शीतल जडे यांनी केले. सुवर्ण लुळे यांच्या वाढदिवशी गरजूंना फराळ आणि वाटप .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या

तरसोद शाळेचे उपक्रमशील शिक्षक तथा प्रदूषण निर्मूलन समितीचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांच्या कन्या सुवर्णा लुल्हे यांच्या २३ व्या वाढदिवसानिमित्त दि १९ नोव्हेंबररोजी ‘इको पॉलि प्लास्ट ‘ या चटई कंपनीतील पावरी व अन्य आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना त्यांच्या कुटुंबियांसह एकूण ५० व्यक्तींना फराळ व महिलांना साडी व सर्वांना मास्क वितरीत करण्यात आले

.कार्यक्रमास प्रमुख अतिथी निवृत्त माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर, तरसोद गणपती देवस्थान प्रतिष्ठानचे विश्वस्त सुधाकर सोनवणे, माजी सरपंच सौ. मनीषा काळे, पोस्ट मास्तर सौ.ज्योती पाटील, आत्माराम सावकारे, कलाशिक्षक सुनील दाभाडे उपस्थित होते.

.असावानगरच्या रस्त्याला उघड्यावर संसार थाटलेले पाथरवट रोहिदास धोत्रे यांच्या कुटुंबीयांना सुवर्णा लुल्हे व समीक्षा लुल्हे यांनी दिवाळी फराळ वाटप केला. याप्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक सुपडू सुतार, गणेश दुग्धालयाचे संचालक मधुसूदन चौधरी, भोकर येथील रा.न.राठी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम चिंचाळे, रणजीत चौधरी, गणेश चौधरी उपस्थित होते.
त्यानंतर जळगाव येथील वीज वितरण कार्यालयाजवळील भिल्ल तांडा बेरोजगार वस्तीतील पन्नास बालकांना मानव सेवा विद्यालयाचे कलाशिक्षक सुनील दाभाडे यांच्या हस्ते दिवाळी फराळ देण्यात आला. हरिविठ्ठल नगर भागात ५० बालकांना जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, महिला अत्याचार निर्मूलन समितीच्या जिल्हा संघटक हर्षाली पाटील व श्रीमंत शिवतेज प्रतिष्ठानचे सचिव आबा माळी यांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आले

.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ‘ इको पॉली प्लास्ट ‘कंपनीचे मालक नितेश जैन व पोलीस पाटील गोकुळ शिरुड यांचे मार्गदर्शन आणि मॅनेजर सचिन शिरसाठ, कर्मचारी शंकर देवकर ,अशोक पवार यांचे सहकार्य मिळाले .

Exit mobile version