Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत आयोजीत स्पर्धेला खा. रक्षा खडसे यांची भेट

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | परीक्षा पे चर्चा उपक्रमाच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला खासदार रक्षा खडसे यांनी भेट दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम अंतर्गत एक्झाम वारीयर्स राबविण्यात येत आहे. देशातील मुलांच्या कौशल्य व विविध गुणांना वाव मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे इ.९ ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने मुक्ताईनगर येथील गोदावरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेस भेट खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी देऊन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विजेते व स्पर्धकांना यावेळी बक्षीस वितरीत केले.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह बेटी बचाव बेटी पढ़ाव चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्रजी फड़के, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, डी.एस.चव्हाण सर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तहसीलदार सौ.श्वेता संचेती, विधानसभा क्षेत्र प्रमुख ललित महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन, ता.सरचिटणीस विनोद पाटील, चंद्रकांत भोलाणे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, शहराध्यक्ष पंकज कोळी, सचिन पाटील, मयूर महाजन, ऋषिकेश पाटील, पवन पाटील, अर्जुन कोळी, गजानन धाडे, ईश्वर मिस्तरी, शुभम कोळी, विष्णु कोळी, निखिल कोळी, गौरव कोळी, अंबादास बेलदार इ. तसेच मोठ्या संख्येने मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version