Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परिचारकास मारहाणीची घटना निंदनीय ; रुग्णसेवा पूर्ववत सुरु होणार : डॉ.पट्टनशेट्टी (व्हीडीओ)

9dcfd170 44e0 49b2 a9e0 20fee3ff71f1

 

पहूर, ता.जामनेर (रविंद्र लाठे) येथील ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारकास उपचारादरम्यान झालेल्या मारहाणीचा प्रकार निंदनीय आहे. परंतू लोकसेवेचे कार्य डोळ्यासमोर ठेवून ठप्प झालेली रूग्णसेवा उदयापासून पुर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.पट्टन शेट्टी यांनी माहिती दिली.

या संदर्भात अधिक असे की, येथील ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारकास उपचारादरम्यान झालेल्या मारहाणप्रकरणी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलन व वैदयकिय अधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याच्या संदर्भात पहूर ग्रामीण रुग्णालयास आज (सोमवार)नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ .पट्टन शेट्टी , जिल्हा शल्यचिकित्सक डॉ .एन.एस. चव्हाण यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अधिपरिचारकास झालेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध केला. पुढे ते म्हणाले की, लोकसेवेचे कार्य डोळ्यासमोर ठेवून ठप्प झालेली रूग्णसेवा उदयापासून पुर्ववत सुरू करण्यात येणार आहे. लोकप्रतिनिधी आणि वैदयकिय अधिकारी यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेस वेठीस न धरता सकारात्मक दृष्टीकोनातून कार्य करावे, असेही ते म्हणाले. भेटीप्रसंगी त्यांनी रूग्णालयातील उपकरणांच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी केली. तसेच या प्रकरणातील संशयितांवर कायदेशीर कारवाई होवून दोषींना शिक्षा व्हावी, असे सांगितले. तसेच अधिपरिचारकावर दाखल केलेला विनयभंगाचा खोटा गुन्हा मागे घ्यावा, जेणे करून कर्मचाऱ्यांना उपचार करताना सुरक्षितता लाभेल,असेही सांगितले.

 

राजीनामे व काम बंद आंदोलन मागे

या घटनेच्या निषेधार्थ वैदयकिय अधिकारी डॉ . हर्षल महाजन व डॉ . मंजूषा पाटील यांनी आपले राजीनामे मागे घेवून रुग्णसेवा देणार असल्याचे सांगितले. तसेच परिचारकांनी पुकारलेला बंद मागे घेणार असल्याचे जाहीर केले.

 

रुग्णकल्याण समिती होणार स्थापन

रूग्णालय आणि रुग्णसेवेसाठी रूग्ण कल्याण समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकत्सक डॉ.एन.एस. चव्हाण यांनी सांगीतले. तसेच ग्रामीण रुग्णालयात कायम स्वरूपी पोलीस कर्मचारी देण्याची मागणीही यावेळी डॉ. चव्हाण यांनी केली. यावेळी प्रभारी वैदयकिय अधिकारी डॉ. हर्षल चांदा , डॉ. हर्षल महाजन, डॉ. मंजुषा पाटील, डॉ.संदीप कुमावत, माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे, समाधान पाटील , रामेश्वर पाटील, संजय देशमुख , ललीत लोढा, पत्रकार मनोज जोशी, शरद बेलपत्रे, गणेश पांढरे, रविंद्र घोलप, रविंद्र लाठे , शंकर भामेरे, किरण जोशी यांच्यासह रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 

Exit mobile version