Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परात्पर गुरू जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त एकता दिंडीचे आयोजन(व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नेहरू चौक येथून हिंदु संस्कृतीच्या रक्षणार्थ परात्पर गुरू जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने हिंदू एकता दिंडीचे आयोजन गुरूवार १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता काढण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंदू जनजागृती समिती, सनातन संस्था यांच्यावतीने हिंदु संस्कृतीच्या रक्षणार्थ परात्पर गुरू जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त हिंदू एकता दिंडी गुरूवार १९ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता काढण्यात आली. ही दिंडी नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक आणि शिवतीर्थ मैदान येथे समारोप करण्यात आला. सायंकाळी साक्षी गणेश मंदिरापासून या दिंडीला प्रारंभ झाला. दिंडीत शौर्य जागरण करणारे मर्दानी खेळ, रणरागिणी पथक, राष्ट्र-धर्म यांविषयीचे उद्बोधक फलक, चित्ररथ, राष्ट्रपुरु षांच्या वेशभूषेतील बालपथक सहभागी झाले होते. या दिंडीत क्रांतीकारकांच्या वेशभूषेतील बालसाधकांचे पथक, टाळ पथक, पारंपरिक वेशभूषेतील नऊवारी साडी परिधान केलेल्‍या महिलांचे रणरागिणी पथक, कलशधारी महिला, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झालेल्या महिला, संपूर्ण दिंडी मार्गावर टाळ वाजवत सहभागी झालेले टाळधारी पथक, हिंदु संस्कृतीची ओळख सांगणारे महिलांचे घागरी फुंकण्याचे पथक, सनातन संस्थेचे कार्य सर्वदूर पसरवण्याचा संदेश असलेल्या सनातन-निर्मित छत्र्या घेऊन सहभागी झालेले महिलांचे पथक, झांज-ढोल आणि लेझीमच्या तालावर नाचत सहभागी झालेले पथक, प्रथमोपचार पथक, प्रत्येक विषयावर विपुल ज्ञान उपलब्ध करून देणारी सनातनची ग्रंथसंपदा आदींचा सहभाग नोंदविला होता.

‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक आणि समाजातील धर्माभिमानी यांनी दिंडीच्या मार्गात रांगोळ्या काढल्या, तसेच पुष्पवृष्टी आणि औक्षण केले. औक्षण करणाऱ्यांच्या घरातील सर्व सदस्यांनीही दिंडीचे भावपूर्ण दर्शन घेतले, तसेच त्यांनी दिंडीतील साधकांना सरबत, गारपाणी देण्याची सेवा केली.

भाग १

भाग २

भाग ३

Exit mobile version