Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परसाडेत खा. रक्षाताई खडसेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन

यावल- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील परसाडे येथील लोकनियुक्त सरपंच मिना राजू तडवी यांच्या वाढदिवसानिमित्त रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसेंच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना अंतर्गत रु.५५ लक्ष, २.५ लक्ष रूपयांचा ५ हजार लिटरचे पाणी टँकर, तडवी कब्रस्थान संरक्षण भिंतीसाठी २० लक्ष रुपये, हायमास्टच्या १० लाईटसाठी १ लक्ष व २० सिमेंट बाक ई. विकास कामांचे “भूमिपूजन व लोकार्पण” करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनी सादिया अरमान तडवी हीला NMMS (आर्थिक दुर्बल घटक) परीक्षेत ८८.४७ % गुण मिळाल्याबद्दल तिचा यावेळी सत्कार करण्यात आला. व नवनिर्वाचित सभापती व संचालक मंडळाचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश संयोजक किशोर कळकर, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल गोविंदा पाटील, कृउबाचे संचालक नारायण चौधरी, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, कृउबाचे नव निर्वाचित संचालक उज्जैनसिंग राजपूत, डांभुर्णीचे माजी सरपंच पुरोजित चौधरी, माजी जि.प.सदस्य सविता भालेराव, यावल कृउबाचे संचालक राकेश वसंत फेगडे, कृउबा संचालीका कांचन फालक, पंकज चौधरी, विलास चौधरी, विलास पाटील, भाजप युवा मोर्चाचे सागर कोळी, डॉ.निलेश गडे, उमाकांत पाटील, दिपक पाटील, देविदास पाटील, विमल महाजन, राजू महाजन, वड्रीचे सरपंच अजय भालेराव, लहु पाटील, मोहराळा सरपंच नंदा महाजन, जहांगीर तडवी, ममता तडवी, ग्राम पंचायत सदस्य भरत महाजन, मुबारक तडवी व ग्राम पंचायत सदस्य, सलिम भुरेखा तडवी, युनुस तडवी, उपसरपंच सुलेमान तडवी, राजू तडवी, रोशन तडवी, रशीद तडवी, बाबासाहेब भालेराव शकीला तडवी, मदिना तडवी, खल्लोबाई तडवी, रमजान तडवी, योगिता सावळे आणि ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

Exit mobile version