Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परप्रांतीयांना जळगाव रेल्वे स्टेशनवर जेवणाची व्यवस्था

जळगाव, प्रतिनिधी । रेडक्रॉस आणि ओसवाल सुख शांती संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या कम्युनिटी किचन तर्फे सूरत, झारखंड आणि विशाखापट्टणम येथे रेल्वेने प्रवास जाणाऱ्या परप्रांतीय श्रमिकांना जळगाव रेल्वे स्टेशन वरून जेवणाची व्यवस्था करण्यात आली. यात लहान मुले, महिला व अनेक श्रमिक होते.

रेडक्रॉस आणि ओसवाल सुख शांती संघातर्फे १००० हून अधिक फूड पाकीट वितरण करण्यात आले. रेडक्रॉसच्या स्वयंसेवकांनी स्वतः सर्व मजूर बांधवांना फूट पॅकेट दिले आणि “आपने हम घर के खाने जैसा स्वादिष्ट खाना दिया है..” अशा शब्दांत त्यांनी रेडक्रॉसचे आभार व्यक्त केले. यावेळी जैन इरीगेशन यांच्या वतीने ५५० फूड पॅकेट, सिंधी बांधवांच्या वतीने ७०० फूड पॅकेट आणि अनिल पगारीया यांच्या वतीने सर्वांनी पिण्याच्या पाण्याची जारची व्यवस्था करण्यात आली. जे लोक निराधार, निराश्रित व गरजू आहेत, त्यांना दोन वेळचे पौष्टीक व पोषणयुक्त जेवण देण्यासाठी इंडियन रेडक्राँस सोसायटी आणि ओसवाल सुख शांती संघाच्या सहकार्याने कम्युनिटी किचनचा उपक्रम सुरू केलेला आहे. जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनानुसार व नेतृत्वाखाली उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्न कुमार रेदासनी, सहसचीव राजेश यावलकर , आपत्ती व्यवस्थापन समितीचे चेअरमन सुभाष सांखला, प्रशिक्षक घन:शाम महाजन, अनिल कांकरीया व अन्य पदाधिकारी व जनसंपर्क अधिकारी उज्ज्वला वर्मा ह्या उपक्रमाचे अत्यंत शिस्त बध्दपणाने नियंत्रण करीत आहेत.

Exit mobile version