Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

परदेशातील युद्धामुळे रासायनिक खतांच्या आयातीवर परिणाम (व्हिडिओ)

*जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |* –  प्रत्येक जिल्ह्याला मागणीनुसार खरीप पेरणी हंगाम सुरु होण्यापूर्वीच रासायनिक खतांचा पुरवठा केला जातो. मात्र, यावर्षी रशिया आणि युक्रेन मधील सुरु असलेल्या युद्धामुळे आगामी काळात रासायनिक खतांच्या उत्पादनावर परीणाम होऊन रासायनिक खतांची टंचाई जाणवण्यासह दरवाढीची देखील शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची आवश्यक त्या प्रमाणात खरेदीसह साठा करून ठेवावा तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक आहे, असे आवाहन जिल्हा कृषी प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरात रशिया आणि युक्रेन मधील संघर्षाचे परिणाम दिसून येत आहेत.  खाद्यतेलासह घरगुती गेंस, वाहनाचे इंधनाचे दर वाढले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक दारात वाढ होऊन जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत आहे. तर दुसरीकडे कृषीक्षेत्राला लागणारी रासायनिक खतांच्या निर्मितीसाठी बेलारुस, रशिया या देशातून अमोनिया, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, फॉस्फरिक ऑसिड, पोटाशची आयात केली जाते.   परदेशात सुरु असलेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे बेलारुस, रशिया या देशातून होणाऱ्या रासायनिक खतांच्या कच्च्या मालाच्या आयातीवर परीणाम झाला आहे. जिल्ह्यासह राज्यातच नव्हेतर देशभरात जूनपासून सुरू होणाऱ्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची तजवीज मार्च-एप्रिलपासूनच केली जाते. परंतु यावर्षी रासायनिक खतांच्या किमती वाढीसह खतांची टंचाई जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक

सध्यस्थितीत युरिया आणि सिंगल सुपर फोस्फेट उपलब्ध आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत खंताचा पुरेशा प्रमाणात साठा असला तरी परकीय देशातील युद्धामुळे आगामी खरीप पेरणी हंगामात रासायनिक तसेच मिश्र खतांची कमतरता भासण्याची चिन्हे दिसून येत असून खतांच्या टंचाईसह दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खताची आवश्यकतेनुसार खरेदी साठा करून ठेवावा. त्यासोबतच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा कृषी विभाग सूत्रांनी म्हटले आहे.

जिल्ह्याला ५ लाख में.टन रासायनिक खतांची आवश्यकता
जिल्ह्यात सुमारे ८.५० लाख हेक्टर कृषी क्षेत्रापैकी ७.५० लाख हेक्टर जमीन पेरणी लागवडीखाली असलेल्या क्षेत्राच्या खरीप व रब्बी हंगामासाठी सुमारे ५ लाख मे.टन रासायनिक खतांची आवश्यकता असते. जिल्हा कृषी विभागामार्फत एप्रिल अखेरीस खतांची मागणी नोंदवून जूनच्या सुरवातीस पुरवठा केला जातो. आगामी काळात रासयनिक खतांचा तुटवडा वा भाववाढ लक्षात घेता शेणखत, कपाशी, तुरीच्या काड्या बरेचसे शेतकरी शेतातच जाळून टाकतात, परंतु असे न करता त्यांचे खत तयार करून किंवा गांडूळ खताची निर्मिती करून सेंद्रिय खतांचा वापर केल्यास जमिनीची पोत देखील सुधारणा होऊन जमिनीची पाणी धारण क्षमतेत वाढ होऊ शकते असेही जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी म्हटले आहे.

 

Exit mobile version