Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीदिनी चौकाचे नामकरण

चाळीसगाव, प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यात आपल्या व्यक्तिमत्वाची छाप पाडणारे लोकनेते, अंबरनाथ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष स्व.पप्पूदादा गुंजाळ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चाळीसगाव – भडगाव रोडवरील खरजई नाका चौकाला “लोकनेते स्व.पप्पूदादा गुंजाळ चौक” असे नामकरण करण्यात आले. 

 

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पुढाकाराने चाळीसगाव नगरपरिषदेत एकमुखाने  ठराव मंजूर करण्यात आला होता. आज दि.७ जुलै स्व.पप्पूदादा गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त सदर चौकाचे नामकरण फलक अनावरण सोहळा आमदार मंगेशदादा चव्हाण व स्व.पप्पूदादा यांचे लहान बंधू, अंबरनाथ नगरपरिषदेचे नगरसेवक उमेशदादा गुंजाळ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. यावेळी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अंबरनाथ नगरपालिका नगरसेवक अशोक गुंजाळ, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम,  माजी जि.प. सदस्य शेषराव पाटील, जेष्ठ नगरसेवक राजू अण्णा चौधरी, नगरसेवक तथा कोळी महासंघ अध्यक्ष अण्णा कोळी, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजयाताई प्रकाश पवार, विजयाताई भिकन पवार, कृउबा माजी संचालिका अलकनंदाताई भवर, रिपाई लोकसभा क्षेत्रप्रमुख आनंद खरात, नगरसेवक अरुण अहिरे, चंदू तायडे, नितीन पाटील, चिराग शेख, जि.प.सदस्य भाऊसाहेब जाधव, अनिल गायकवाड, माजी पंचायत समिती सभापती दिनेशभाऊ बोरसे, पं.स.सदस्य सुभाष पाटील, भाजपा सरचिटणीस धनंजय मांडोळे, अमोल नानकर, गिरीश बऱ्हाटे, अमोल चव्हाण, रोहिणीचे माजी सरपंच अनिल नागरे, वाघडू आबा पाटील पोलीस, अनिताताई शर्मा, कैलास पाटील, निंबा जगताप, मधुकर गुंजाळ, देवानाना जाधव, पप्पूदादा प्रतिष्ठाणचे राहुल पाटील, सचिन फुलवारी, साहेबराव काळे, रोहित जाधव, सचिन खेडेकर, मासिक शाहू मराठाचे संपादक प्रशांत गायकवाड, संजय कापसे, रणजित पाटील, डॉ.प्रशांत एरंडे, संता पेहलवान, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सुनील पवार, शहराध्यक्ष भावेश कोठावदे, खुशाल पाटील यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील दक्षिणी मराठा समाज बांधव, शाहू महाराज मराठा मंडळाचे पदाधिकारी व स्व.पप्पूदादा गुंजाळ यांच्यावर प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ.कावेरी शांताराम पाटील व टीमने लोकनेते स्व.पप्पूदादा गुंजाळ चौकाला सुबक रांगोळ्या काढून सजावट केली होती तर नामफलकाला फुल – पुष्पगुच्छ यांनी सजावट करण्यात आली होती.

Exit mobile version