Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना जन्मदिनाच्या पूर्व संध्येला उर्दू साहित्यिकांची कृतज्ञ पूर्वक आदरांजली (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । 

नही खेल है दाग यारो से कह दो
के आती है उर्दू जुबा आते आते

 

मी अलिफ ( अ) लिहून उर्दू ची सुरुवात केली आहे. त्यानुसार उर्दू बोलो,उर्दु लिखो, उर्दू पढो समजो ज्याप्रमाणे श्रद्धेय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांनी प्रत्येक भाषेला महत्त्व दिले.  त्यांच्या त्या कृतार्थ जळगाव जिल्हा मन्यार बिरादरी ने त्यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त जो उर्दू साहित्यिकांचा मेळावा आयोजित केला आहे. त्या मेळाव्याचे मी उद्घाटन करीत आहे, आशा शब्दात महापौर जयश्री महाजन यांनी आपल्या भावना व्यक्त करून उर्दू मेळाव्याचे उद्घाटन केले.

त्या वेळी व्यासपीठावर मुंबई उर्दू कारवाचे अध्यक्ष फरीद अहमद, एटीएमचे अध्यक्ष एजाज मलिक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. रफिक आजी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे टेक्नॉलॉजी हेड ऑफ द डिपार्टमेंट प्रो. डॉ. गयास उस्मानी, पिंच बॉटल चे मॅनेजिंग डायरेक्टर जफर शेख, श्रेष्ठ कादंबरीकार व कवी जोहर उस्मानी तथा जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख उपस्थित होते.

यावेळी उर्दू तराना एकेके गर्ल्स हायस्कूल च्या विद्यार्थिनींनीनी सादर करून सर्वाना मंत्र मुग्ध केले.
प्रास्ताविक मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी सादर करताना प्रथमताच जिल्ह्यातील सर्व उर्दु साहित्यिकांना एका छताखाली बोलून त्यांचा सन्मान करण्याचा प्रयोग करीत असून यशस्वी झाल्यास तो जळगाव पॅटर्न म्हणून प्रसिद्धीला येईल व त्यामुळे उर्दू लेखाकार शायर (कवी) अफ़सनानिगार ( लघु लेखक व कादंबरीकार) व सहाफी(पत्रकार) यांचे महत्व समाजाला समजेल म्हणून पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष फरीद अहमद यांनी महाराष्ट्र मध्ये प्रथम ताच अशा स्वरूपाचा कार्यक्रम होत आहे आणि हे कांताई सभागृह या गोष्टीची ऐतिहासिक नोंद ठेवील की तो कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाला. जे कार्य आम्ही मुंबईपासून करू शकत नाही ते जळगावात मन्यार बिरादरीच्या माध्यमाने साकारण्यात आल्याचा मला अभिमान आहे. महापौर यांना त्यांनी उर्दू घर साठी जागेची मागणी केली.

यांनी व्यक्त केले मनोगत
डॉ. गयास उस्मानी यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे, परंतु एकाच छताखाली शायर कवी अफसाना निगार लघु लेखक व कादंबरीकार सहाफी पत्रकार एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारला हा एक ऐतिहासिक क्षण मी विसरू शकत नाही. राष्ट्रवादीचे तथा एटीएमचे अध्यक्ष एजाज मलिक यांनी आपल्या मनोगतात उर्दू भाषा तिचे महत्त्व व त्यासाठी त्यांची संस्था करीत असलेल्या कार्याचा आढावा सादर केला. तर अक्रम कुरेशी, अंजर मुस्तफाआबादी यांनी आपल्या कविता सादर केल्यात.

२७२साहित्यिकांचा गुणगौरव

जिल्ह्यातील एकूण ३१२ उर्दू साहित्यकार यांना व्हाट्सअप द्वारे आमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी २७२ साहित्यिक उपस्थित राहून आपला सत्कार स्वीकारला .उपस्थितांमध्ये पुरुषांचा सहित महिलांचा सुद्धा सहभाग होता.

यशस्वीतेसाठी बहारदार अशा कविता सादर करून सूत्रसंचालन करणारे साबीर मुस्तफा आबादि तसेच यशस्वीतेसाठी कासिम उमर, मुजाहिद खान, मोहसीन शेख,अल्ताफ शेख,रऊफ टेलर,इमरान खान ,तय्यब शेख, जाहिद शेख, वनिता विश्व महिला मंडळ व भवरलाल अँड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशन ने परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला
आभार बिरादरीचे सचिव अब्दुल अजीज शेख यांनी मानले तर पाहुण्यांचे स्वागत सय्यद चाँद, हकीम चौधरी, असलम शेख , तय्यब शेख, लतीफ शेख, फारुक शेख आदींनी केले.

Exit mobile version