Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकार डी बी पाटील , सुरेश पाटील यांना पुरस्कार जाहीर

 

 यावल : प्रतिनिधी ।  राज्य पत्रकार संघ ( मुंबई ) यांच्या वतीने जेष्ठ पत्रकार डी बी पाटील यांना मुकनायक तर सुरेश पाटील यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे

 

रावेर येथील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका कार्यकारीणीच्या वतीने येत्या  ८ ऑगस्टरोजी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

 

उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष  प्रविण सपकाळे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गायके यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर तालुका पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल यांच्यासह सर्व पत्रकार संघ सदस्य पदाधिकारी मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत खिर्डी येथील मासिक मिटीग मध्ये रावेर – यावल तालुक्यातील जेष्ठ पत्रकार  व्यक्तींना जीवनगौरव, मुकनायक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

 

रावेर तालुक्यातील जेष्ठ पत्रकार देवलाल पाटील ( दै तरुण भारत रावेर तालुका प्रतिनिधी ) यांना मुकनायक, दिलीप वैद्य  ( सकाळ वृत्तसेवा रावेर तालुका प्रतिनिधी ) यांना जीवनगौरव पुरस्कार ,   यावल तालुक्यातील जेष्ठ पत्रकार डि बी पाटील ( दै लोकमत यावल प्रतिनिधी ) यांना मुकनायक  व सुरेश पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार राज्य पत्रकार  संघाच्या  रावेर तालुका  शाखेच्या  वतीने जाहीर करण्यात आले आहेत.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले, कार्याध्यक्ष योगेश सैतवाल, सद्दाम पिंजारी, ईश्वर महाजन यांच्यासह तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. डी.बी .पाटील  व सुरेश पाटील यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकार राजु कवडीवाले, अय्युब पटेल , अरूण पाटील , शेखर पटेल , सुनिल गावडे , सुनिल पिंजारी , महेश पाटील , तेजस यावलकर, भरत कोळी , प्रमोद वाणी आदींनी  त्यांचे अभिनंदन केले आहे

 

Exit mobile version