Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकार खेमचंद पाटील यांना ‘महाराष्ट्र दिपस्तंभ पुरस्कार’ प्रदान

purskarhambardi

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हंबर्डी येथील रहिवाशी तथा पत्रकार खेमचंद पाटील यांना सामाजिक परिवर्तनात आपल्या कर्तुत्वाने केलेल्या सेवेचा गौरव तसेच त्यांनी ‘आपले हंबर्डी गाव’ या पुस्तकाचे लेखन तसेच सामाजिक लेखन करून त्याच्या जन्म गावाबद्दल अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

मिळालेल्या या पुरस्काराबद्दल परिसरात त्यांचे सर्वत्र सन्मानाचे कौतुक होत आहे. खेमचंद पाटील यांचे कार्य भविष्यात समाजातील युवकांना प्रेरणादायी आहे. त्यांचे कर्तृत्व व प्रतिभाशाली व्यक्तिमत्व लेवा पाटीदार समाजातून पुढे आलेले आहे. त्यांनी त्यांच्या प्रामाणिकपणाच्या व कठोर परिश्रमाच्या साहाय्याने लेखन, पत्रकारिता, व्यवसाय या क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे.

नाशिक येथे झालेल्या नेहरू गार्डन जवळील परशुराम साईखेडकर नाट्य मंदिरात प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याहस्ते ‘महाराष्ट्र दिपस्तंभ सेवा पुरस्कार २०२०’ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यावेळी पुरस्कार प्रदान झाल्यानंतर प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना आपले हंबर्डी गाव पुस्तक भेट देऊन पुस्तकाचे लेखक खेमचंद पाटील यांच्यासोबत त्यांनी हंबर्डी गावा बद्दल दिलखुलास बातचीत केली. यावेळी संमेलनाध्यक्ष कौशिक गायकवाड, उद्योजक सोलापूर, अंकुश शिरसाट उद्योजक नाशिक, सुधीर जाधव, उद्योजक कणकवली, जयश्री सावर्डेकर, समाजसेविका महाराष्ट्र आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला.

Exit mobile version