Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकाराला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा : पत्रकार संघाची मागणी

सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  येथे मोठा आळ परिसरात दि.६ ऑक्टोंबर २०२२ रोजी श्री दुर्गा विसर्जन मिरवणुकचे वृत्तसंकलन व माहिती गोळा करीत असतांना पत्रकारास शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेतील संशयितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने  करण्यात आली आहे.

 

पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांना वृत्तसंकलन करीत असताना काही एक कारण नसताना लतेश रमेश सरोदे व त्याचा सोबत त्याचे दोन मित्र नाव गाव माहित नाही यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून दि.७ ऑक्टोंबर रोजी सदर प्रकारे अन्याय झालेल्या पत्रकार जितेंद्र कुलकर्णी सोबत सातपुडा जर्नलिस्ट असोशियनचे अध्यक्ष तथा साप्ताहिक लेवाजगत वृत्तपत्राचे संपादक शाम पाटील, पत्रकार प्रविण पाटील, दिपक श्रावगे, रवींद्र हिवरकर, आत्माराम तायडे, राजू दिपके, साजिद उर्फ मडा, युसुफ शाह, दिलीप चांदलकर, फरीद शेख व कोचुर येथील पत्रकार कमलाकर पाटील, पंकज पाटील, राजेंद्र भारंबे चिनावल यांनी गुन्हेगाराविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी व अन्यायग्रस्त पत्रकारास न्याय मिळावा याकरिता सावदा पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते.

सदर प्रकरणी पत्रकार जितेंद्र अशोक कुलकर्णी उर्फ पिंटू कुलकर्णी यांनी सावदा पोलिस ठाण्यात समक्ष हाजर होवून दि.८ ऑक्टोंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून सामनेवाला लतेश रमेश सरोदे व त्याचे सोबत असलेल्या नाव गाव माहित नाही अंशाविरुद्ध पनाका रजि.नं.६३६/२०२२ भादवीचे कलम ३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.तरी वरील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुका यांच्या वतीने सावदा पोलिस स्टेशनला सोमवारी सकाळी ११ वाजता निषेध निवेदन देण्यात येणार आहे तरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच परिसरातील पत्रकार बंधुंनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने करण्यात आले आहे .

 

Exit mobile version