Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्रकारांना ६ फेब्रुवारी रोजी होणार हेल्मेटचे वाटप

helmet

जळगाव, प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जळगाव जिल्हा शाखा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय व नजर फाउंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने ६ फेब्रुवारी रोजी पत्रकार दिनाचे व रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधूत जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पत्रकार बांधवाना हेल्मेट वाटप करण्यात येणार आहे.

 

सदर कार्यक्रम जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी १.३० वा.सुरु होईल. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन पाणी पुरवठा स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघांचे प्रदेशअध्यक्ष वसंतराव मुंडे हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून आ.किशोर पाटील, आ. सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही, दैनिक लोकमत जळगाव आवृत्तीचे संपादक मिलिंद कुळकर्णी, प्रदेश सरचिटणीस विश्वासराव आरोटे हे उपस्थित असतील.

त्याचबरोबर मुकुंद बिल्दीकर, प्रविणसिंग पाटील, माजी आमदार दिलीप वाघ, संजय कुमावत, गोविंद शिरोळे, प्रदीप शांताराम पाटील, व्यंकटेश कलाल, पत्रकार संघांचे विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष प्रमोद सोनवणे याची उपस्थित राहणार आहेत. पत्रकारांनी कार्यक्रमाला येतांना आपल्या वृत्तपत्र संस्थेचे ओळखपत्र सोबत आणावे. आल्यावर पुन्हा सभागृहस्थळी आपली नावनोंदणी करून आयोजक यांच्याकडून कुपन घ्यावे, त्यानंतरच हेल्मेट दिले जाईल.

हा कार्यक्रम पत्रकार बांधवांसाठी असून सर्वांना सोयीचे व्हावे, म्हणून सहकार्य करावे, असे अवाहन पत्रकार संघांचे जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद कुळकर्णी, वृत्त वाहिनी विभाग जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, वृत्त वाहिनी विभाग कार्यध्यक्ष संतोष ढिवरे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, ग्रामीण कार्यध्यक्ष भगवान मराठे, जिल्हा उपाध्यक्ष नरेश बागडे, सुनील भोळे, मुकेश जोशी, दीपक सपकाळे, रितेश माळी, चेतन निंबोळकर, स्वप्नील सोनवणे यांनी केले आहे.

Exit mobile version