Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्या पतीविरोधात गुन्हा

FIR

जळगाव प्रतिनिधी । माहेरी असलेल्या पत्नीला तीन वेळा तलाक शब्दाचा उच्चार करीत तोंडी तलका देणाऱ्या पतीविरोधात शनीपेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील ईस्माल पुरा भागातील रहिवासी शहिस्ता बी शेख सुलतान कुरेशी (वय-२५) या आपल्या वडीलांकडे राहतात. त्यांचे गेंदालाल मिल परिसरातील सुरेशदादा जैन नगरातील शेख सुलतान शेख लुकमान कुरेशी (वय- ३०) यांच्यासोबत विवाह झाला आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास शेख सुलतान शेख कुरेशी यांनी पत्नीला शिवीगाळ करीत आता मला तुझी गरज नाही, मी तुला आता आजाद करतो असे म्हणत त्यांना तीन वेळा तलाक अस शब्द उचाच्चरुन तोंडी तलाक दिला.

पतीविरोधात तक्रार
पतीने तोंडी तलाक दिल्यानंतर शेख सुलताना शेख लुकमान यांनी तात्काळ शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरुद्ध तोंडी तलाक दिल्यायप्रकरणी तक्रार दाखल केली. याप्रकरणीशेख सुलताना शेख लुकमान यांच्या फिर्यादीवरु त्यांचा पती शेख सुलतान शेख लुकमान कुरेशी याच्याविरुद्ध मुस्लिम महिला विवाहावरील हक्काचे संरक्षण कायदा २०१९ कलम ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ सलिम पिंजारी करीत आहे.

Exit mobile version