Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पत्नीच्या अतीस्वच्छतेच्या सवयीला कंटाळून पतीने केला तिचा खून

Crime News 600x337 1

 

बंगळुरु (वृत्तसंस्था) पत्नीच्या अतीस्वच्छतेच्या सवयीला कंटाळून पतीने तिचा खून करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकमधील मैसुरमध्ये घडली आहे. पुत्तामणी (38) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून शांतामूर्ती (40) असे तिच्या पतीचे नाव आहे.

 

पुत्तामणी स्वच्छतेचा अतिरेक करायची. अती स्वच्छतेची सवय असल्याने त्या दिवसभरात अनेकदा आपल्या मुलांना अंघोळ घालायच्या. ती अंधश्रद्धेवर फार विश्वास ठेवत. तिच्या घरी येणाऱ्या व्यक्तीलाही ती घरात येण्यापूर्वी आंघोळ करुन या असे सांगत. यावरुन अनेकांनी त्यांच्याकडे जाणे-येणे बंद केले होते. एवढेच नव्हे तर, नोटांना विविध जातीचे लोक स्पर्श करतात. त्यामुळे नोटा अपवित्र होतात म्हणून घरी आणलेल्या नोटाही धुवून वाळत घालायच्या, असे त्यांचे शेजारी सांगतात. यावरुन झालेल्या वादातून पतीने पुट्टमणी यांची हत्या केल्याचे समजते.

Exit mobile version