Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पडळकर यांच्या वक्तव्याचा शेंदुर्णीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध

शेंदुर्णी, ता. जामनेर विलास पाटील । भाजपचे विधानपरिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा अनादर करणारे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी केले होते त्याचा निषेध आज शेंदूर्णी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.

जामनेर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या नेतृत्वात पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्‍वर कातकडे यांना लेखी निवेदन देऊन भाजपचे आमदार पडळकर यांचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या धिक्काराच्या घोषणाही देण्यात आल्या. यावेळी संजय गरुड यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त केल्या. तसेच पडळकर यांनी माफी मागावी अशी मागणीही केली नाहीतर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे स्टेशन परिसर दणाणून गेला होता. या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रवी गुजर, संजय नजने, विश्‍वनाथ पाटील,फारुख खाटीक, गजानन धनगर, योगेश गुजर, संदीप चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version