Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार नाहीत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्यानंतर पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करतील, असे बोलले जात होते. परंतू पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे.

 

देशातील २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर आज रात्री पंतप्रधान मोदी संबोधित करणार अशी चर्चा होती. यानंतर पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करतील, असे बोललं जात होतं. पण पंतप्रधान मोदी आज देशाला संबोधित करणार नाहीत, अशी माहिती केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिली आहे.

Exit mobile version