Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान मोदींवर खुनाचा गुन्हा दाखल करा : प्रकाश आंबेडकर

सोलापूर (वृत्तसंस्था) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणून कार्यक्रम केला, त्यामुळे कोरोनचा शिरकाव झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी केला.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, कोरोनापेक्षा जास्त लोक टीबीने दगावले होते, टीबीच्या वेळेस लॉकडाऊन झाले नव्हते. कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक जण उपाशी आहेत, रोजगार बंद आहेत. सर्वसामान्यात कोरोनाची रिंगटोन लावून भीती निर्माण केली जात आहे. ३ महिने झाले तरी रिंगटोन बदलली नाही, यामागे काय षडयंत्र आहे?, हे मोदींनी सांगितल्याशिवाय कळणार नाही, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर शासनाने आपल्याला ब्लॅकमेल केलं, जीवन उध्वस्त केले आहे. त्यामुळे 30 तारखेची वाट न बघता सामान्य आयुष्य जीवन जगायला सुरुवात करा, असेही माझे आवाहन आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version