Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शीसगंज साहेब गुरुद्वाराला अचानक भेट

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे लोक इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वणवण भटकत आहेत.तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सकाळी अचानकच गुरुद्वारा शीसगंज साहेब येथे भेट दिली. गुरु तेग बहाद्दर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वच्या निमित्ताने पूजा करत या ठिकाणी श्रद्धासुमने अर्पण केली. कोणताही सुरक्षा मार्ग आणि सुरक्षा व्यवस्थेशिवायच पंतप्रधानांनी या ठिकाणाला भेट दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून गुरुद्वारामध्ये आले, त्यावेळी रस्त्यांवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पाहायला मिळाली नाही. शिवाय कोणत्याही प्रकारचे प्रतिबंधही या ठिकाणी लावण्यात आले नव्हते. गुरुद्वारामध्ये येण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी गुरु तेग बहाद्दर यांनाही श्रद्धासुमने अर्पण केली. 

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपण श्री शीशगंज साहेब गुरुद्वारा येथे भेट दिल्याचे सांगितले. सोबतच काही छायाचित्रही त्यांनी पोस्ट केली. मागील वर्षी केंद्रानं गुरु तेग बहाद्दर यांच्या 400 व्या प्रकाश पर्वाला धुमधडाक्यात साजरा करण्याचा मानस व्यक्त केला होता. प्रकाश पर्व हे एक राष्ट्रीय कर्तव्य असल्याचंही मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलं होतं.

Exit mobile version