Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनापुढे हात टेकले : राहुल गांधी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था)
देशभरात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णसंख्या वाढते आहे अशा सगळ्या परिस्थितीत सरकारकडे कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी कोणतीही योजनाच नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे हात टेकले आहेत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.

 

राहुल गांधींनी ट्विट केले की, कोरोना विषाणू देशाच्या नवीन भागात वेगाने पसरत आहे. भारत सरकारकडे कोरोनाला सामोरे जाण्याची कोणतीही योजना नाही. कोरोनाचा मुकाबला करुन त्याला हरवणार अशा वल्गना दिल्या गेल्या प्रत्यक्षात मोदी सरकारकडे यासाठीचे कोणतेही धोरण नाही. पंतप्रधान गप्प आहेत. तसेच या आजाराला सामोरे जाण्यास नकार दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रोगापुढे आणि त्याच्या वाढत्या प्रादुर्भावापुढे हात टेकले आहेत, असाही आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Exit mobile version