Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांच्या विरोधात बोलल्याने सरकारी अधिकारी निलंबित

 

प्रयागराज : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद भाष्य केल्याच्या आरोपावरुन एका सरकारी अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्यात आलं आहे. 

 

उत्तरप्रदेशातल्या जखनिया भागाचे उपजिल्हाधिकारी सूरज यादव यांनी  सांगितलं की ओडरायी गावाचे लेखापाल जितेंद्रनाथ सिंह यांनी पंतप्रधानांच्या विरोधात अपमानास्पद भाष्य केलं. हे सरकारी नियमावलीच्या विरुद्ध आहे.

 

सूरज यादव यांनी सांगितलं की तक्रार मिळाल्यानंतर या प्रकाराबद्दल तपास करण्यात आला. या तपासाअंती हे आरोप सत्य असल्याचं समोर आलं आहे. यानंतर लेखापाल जितेंद्रनाथ यांना सरकारी नियमावलीचं पालन न केल्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

 

याआधीही सरकारी अधिकाऱ्यांवर अशा पद्धतीची कारवाई झाली आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारी पोस्ट एका अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केली होती. यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर या अधिकाऱ्याने ही पोस्ट डिलीट केली होती. मात्र उत्तरप्रदेश सरकारने   या अधिकाऱ्याला निलंबित केलं.

 

२०१९च्या निवडणुकांच्या वेळी ओडिसाच्या संबलपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या हेलिकॉप्टरची चौकशी करण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोगाने एका अधिकाऱ्याला निलंबित केलं होतं. आयोगाचं म्हणणं होतं की या आयएएस अधिकाऱ्याने एसपीजी सुरक्षेशी निगडीत आयोगाच्या निर्देशांचं पालन केलं नाही.एसपीजी सुरक्षा असलेल्या लोकांना अशा प्रकारच्या चौकशीतून सूट असते. त्यामुळे या नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली.

 

Exit mobile version