Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारांचा राजीनामा

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुख्य सल्लागार पी.के. सिन्हा यांनी आज राजीनामा दिला आहे.

 

वैयक्तिक कारणांमुळे सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सिन्हा यांना सप्टेंबर २०१९ मध्ये पंतप्रधानांच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्यात आलं होतं.

 

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७७ च्या तुकडीचे ते अधिकारी होते. त्यांनी या अगोदर पंतप्रधान कार्यालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी म्हणूनही काम केलेलं आहे.  ते ऊर्जा मंत्रालयात सचिवपदी देखील कार्यरत होते. तसेच, त्यांना चार वर्ष मंत्रीमंडळ सचिव म्हणूनही काम केलंलं आहे.

 

सिन्हा यांनी दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवलेली आहे.  दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून अर्थशास्त्रात पदव्युत्तर परीक्षा देखील पास केलेली आहे. सेवाकाळात त्यांनी लोक प्रशासनात पदव्युत्तर पदविका आणि सामाजिक विज्ञान विषयात एम.फिल देखील पूर्ण केलेलं आहे. त्यांनी उत्तर प्रदेश राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये विविध महत्वांच्या पदावर काम केलेलं आहे.

Exit mobile version