Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंजाबमध्ये विषारी दारूमुळे ३८ तर आंध्र प्रदेशात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्थ) पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने ३८ जण, तर आंध्र प्रदेशच्या प्रकाशाम जिल्ह्यात सॅनिटायझर प्यायल्याने ९ जण मरण पावले आहे. या घटनेमुळे दोन्ही राज्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

पंजाबमध्ये अमृतसर, बटाला आणि तरुणतारण या जिल्ह्यांमध्ये विषारी दारू प्यायल्याने ३८ जणांचा बळी गेला. पोलिसांनी याप्रकरणी छापेमारी सुरु केली आहे. तर एका महिलेला अटकही केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पोलिसांचे विशेष तपास पथक स्थापन केले आहे. दुसरीकडे लॉकडाउनमुळे आंध्र प्रदेशातही दारूच्या विक्रीवर खूप निर्बंध आहेत. त्यामुळे प्रकाशम जिल्ह्यातील चेरीकुडी गावातील काही जणांनी सॅनिटायझर प्यायल्यामुळे त्यातील ९ जण दोन दिवसांत मरण पावले आहेत. याआधीही अनेक राज्यांमध्ये लॉकडाउनच्या काळात सॅनिटायझर प्यायल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Exit mobile version