Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंचायत समिती सदस्य आ. जानकरांना भेटले : भेटीच्या टायमिंगवरून चर्चेला उधाण

रावेर प्रतिनिधी | येथील गटशिक्षण विभागातील महापुरूषांच्या प्रतिमांच्या अनादर प्रकरणाची दखल घेण्याचे माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी संकेत दिल्यानंतर येथील पंचायत समिती सदस्यांनी त्यांची भेट घेतली. ही केवळ सदिच्छा भेट होती, की यामागे संबंधीत प्रकरणात अधिकार्‍यांना वाचविण्याचे साकडे घालण्यात आले ? याबाबत आता संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.

रावेरात गटशिक्षण विभागात महापुरुषांच्या अनादर प्रकरणाची दखल पंचायत राज समिती सदस्य तथा माजी मंत्री आ. महादेव जानकर यांनी घेतल्याचे वृत्त येताच काल पंचायत समिती सदस्यांनी जळगावात जाऊन श्री जानकर यांची भेट घेतल्याने राजकीयक्षेत्रात चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. झालेली भेट अनादर प्रकरणी कारवाई करावी यासाठी होती. कि आधिकार्‍यांना वाचविण्यासाठी यावर चर्वण सुरू झाले आहे. गटशिक्षण विभागाने महापुरुषांचा अनादर करून पंचायत समितीची प्रतिमा मलीन केली आहे. या गंभीर प्रकारावर विद्यमान पंचायत समिती सत्ताधारी जरी गप्प असले तरी जिल्हात आलेली पंचायत राज समितीच्या सुमारे २१ आमदारां पैकी एक असलेले माजी मंत्री महादेव जानकर यांनी दखल घेतली होती. व कारवाई करण्याचे संकेत दिले होते. परंतु काल दिवसभर अचानक राजकारणाने कलटणी घेतली व काही विद्यमान पंचायत समिती सदस्यांनी माजी मंत्री महादेव जानकर यांची जळगावात जाऊन भेट घेतल्याने काल दिवसभर रावेर तालुक्यात उलट-सुलट चर्चा होती.

दरम्यान, रावेर शिक्षण विभागाच्या कार्यालयात महापुरुषांचा अनादर झाल्याची मोठी खळबळजनक घटना जिल्हात पिआरसी असतांना घडली आहे. हा प्रकार खुप गंभीर असून या सर्व गोष्टींमुळे आमच्या भावना दुखावल्या असून शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी यांना जबाबदार धरुन त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी निळा निशाण सामाजिक संघटनचे आनंद बाविस्कर यांनी रावेरात पत्रकार परिषद घेऊन केली आहे. यातच आता पंचायत समितीच्या सदस्यांनी आ. जानकरांची भेट ही अनेक चर्चांना आमंत्रण देणारी ठरली आहे.

Exit mobile version