Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंचायत समितीत भ्रष्टाचार वाढल्याने तालुक्याचा विकास खुंटला – शेखर पाटील

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीत ५ वर्षापासून सुरू असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या प्रभारी राजमुळे तालुक्याच्या विकासासह पंचायत समितीमधील विविध विभागाच्या भोंगळ कारभाराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष झाले आहे. असा आरोप यावल पंचायत समितीचे माजी गट नेते शेखर पाटील यांनी गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी दुपारी पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदे समोर केला .

यावल येथील पंचायत समितीमध्ये गेल्या पाच वर्षापासून गटविकास अधिकारी हे प्रभारी राहीले असल्याने पाच वर्षांच्या कार्यकाळात पाच अधिकाऱ्यांकडे हा प्रभार राहिला पंचायत समितीच्या विविध विभागातील १५ तक्रारी मागील काळात पंचायत समितीच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये केल्या मात्र संबंधित विभागाकडून त्याचे अद्यापही निराकरण होत नसल्याचा आरोप शेखर पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला आहे पंचायत समिती मधील ग्रामविकास विभाग ,बांधकाम विभाग, कृषी विभाग , यासह महिला व बालविकास प्रकल्प विभागाच्या सुमारे १५ तक्रारी मासीक बैठकीत करण्यात आल्या होत्या ह्या तक्रारी मासिक बैठकीतही पटलावर ठेवण्यात आल्या होत्या मात्र वेळोवेळी तत्कालीन प्रभारी अधिकारी यांचेकडे चौकशीची मागणी केली. मात्र प्रभारी गटविकास अधिकारी सतस बदलत राहिल्याने तसेच विविध विभागात असलेल्या प्रभारी राज मुळे त्या तक्रारी तशाच प्रलंबित राहिल्या असल्याचे पाटील यांनी सांगितले . वरिष्ठांकडेही तक्रारी सादर करून तक्रारींचे निराकरण झाले नसल्याचे सांगत पंचायत समितीच्या कोणत्याही विभागात अधिकारी/ कर्मचारी नियमित हजर राहत नसल्याची तक्रारही त्यांनी करत यामुळे तालुक्याच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोप केला आहे.

कार्यालयात तक्रारी प्रलंबित नाही
याबाबत पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांच्याशी पत्रकारांनी संपर्क साधला असता त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की गेल्या दोन महिन्यापूर्वी शेखर पाटील यांनी एक तक्रार केली होती त्या संदर्भात संबंधित अधिकारी यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत माझ्याकडे दोन महिन्यापूर्वीच पदभार आला असून मागील काळातील त्यांचे तक्रारी संदर्भात माझ्याशी बोलणे झाले नाही. तरीही त्यांच्या प्रलंबित तक्रारी असल्यास त्यांचे निराकरण केले जाईल.

Exit mobile version