Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पंकजा मुंडे, शेलार, तावडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता !

मुंबई (वृत्तसंस्था) भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीमध्ये पंकजा मुंडे,आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर पाटील यांना स्थान मिळण्याचे निश्चित झाल्याचे वृत्त आहे. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत आज देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार आहे, अशीही माहिती समोर येत आहे.

 

 

जे. पी. नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरच्या या नव्या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार नेत्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील या महाराष्ट्रातील चार नेत्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीही भाजपच्या संसदीय कार्य समितीत नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले होते.

Exit mobile version