Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्हावी येथील कोरोनाचा संशयित जिल्हा रूग्णालयात

फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या न्हावी येथील रूग्णालया कोरोनाचा संशयित म्हणून जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, न्हावी येथे एक व्यक्ती काही दिवसांपूर्वीच मुंबई येथून आला आहे. त्याला कोरोना सदृश विकाराची लागण झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे त्याला जळगाव येथील जिल्हा रूग्णालयात थोड्याच वेळापूर्वी पाठविण्यात आले आहे. फैजपूर येथील एक संशियत दोन दिवसांपूर्वीच जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला होता. मात्र त्याची चाचणी निगेटीव्ह आल्याने परिसरातील जनतेने सुटकेचा श्‍वास सोडला होता. यानंतर आता न्हावी येथील संशयिताची चाचणी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version