Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना आदरांजली

जळगाव प्रतिनिधी । गांधी रिचर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना आज आयोजित कार्यक्रमात आदरांजली अर्पण करण्यात आली.

कस्तुरबा सभागृहात आयोजित कार्यक्रमात गांधी रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, लेखक, वक्ते आणि पद्मभूषण न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी प्रा. शेखर सोनाळकर, अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी डॉ. जॉन चेल्लादुराई, महाराष्ट्र हरिजन सर्वोदय मंडळाचे सरचिटणीस चंद्रकांत चौधरी, परिवर्तनचे शंभू पाटील, सतीश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. उदय महाजन यांनी माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांचा तर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, डॉ. सुदर्शन अय्यंगार यांचे संदेश अश्‍विन झाला यांनी वाचून दाखवले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आपल्या मनोगतातून म्हणाले की, न्यायमूर्ती धर्माधिकारी व भवरलालजी यांच्यात वारंवार होणार्‍या चर्चेतून गांधी अध्यासनाचे रुपांतर गांधी रिसर्च फाउंडेशन व पर्यायाने गांधीतीर्थ उभारणीत झाले. न्या. धर्माधिकारी व भवरलालजी जैन याची भेट होणे हे भाग्याचे ठरले. त्यांच्या विचारातून हे गांधीतीर्थ निर्माण झाले. अनेक पिढ्यासाठीचे संचित इथे निर्माण झाले आहे, अशी दलीचंद जैन यांनी श्रद्धांजली अर्पण केली. विविध मान्यवरांनी न्यायमूर्ती धर्माधिकारी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली अर्पण केली.

Exit mobile version