Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्याय देवतेवर १०० टक्के विश्वास – प्रा. चंद्रकांत सोनवणे (व्हिडीओ)

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोपडा येथील आमदार लताताई सोनवणे यांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.  आज त्यांचे पती प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, आम्ही पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका सादर करणार आहोत. तसेच या निर्णयाने आमदारकी रद्द होणार नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

 

प्रा. चंद्रकात सोनवणे यांनी सांगितले की,  सुप्रीम कोर्टात  दाखल करण्यात आलेली  याचिका  रद्द करण्यात आलेली आहे.  ती  पुन्हा चालविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी यावेळी न्यायदेवतेवर  १०० टक्के विश्वास  व्यक्त केला. आजोबांचे नावासमोर टोकरे कोळी असतांना मिस स्क्रिप्ट केले गेले. तसेच आमच्या नातेवाईकांच्या वडिलांच्या नावाऐवजी मुलांच्या नावाची एन्ट्री दाखविण्यात आली आहे. हि टेक्नीकल चूक झाली आहे ती न्यायालयासमोर आणण्यासाठी आम्ही पुन्हा याचिका दाखल करणार आहोत असे स्पष्ट केले. तसेच  आमची आमदारकी जात नाही. परंतु, दुर्दैवाने आमदारकी गेली तरी आगमी काळातील निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

 

Exit mobile version