Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायालय परिसरातून एकाची दुचाकी लांबविली.

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जिल्हा न्यायालयाच्या जवळून एका तरूणाची २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, गजानन तुकाराम चौथे (वय-२८) रा. मन्यारखेडा ता. भुसावळ ह.मु. पिंप्राळा जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत आहे. रविवारी १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता गजानन चौथे हा तरूण त्यांची दुचाकी (एमएच १९ बीझेड ८४५८)ने जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंग करून लावली होती. व कामानिमित्त निघून गेले. रात्री ९ वाजता दुचाकीजवळ आले असता त्याला त्याची दुचाकी जागेवर दिसून आली नाही. दुचाकीचा सर्वत्र शोध घेवून ही मिळाली नाही. अखेर मंगळवारी २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर निकुंभ करीत आहे.

Exit mobile version