Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्याबद्दल भाजप नेत्यांचा सत्कार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओ.बी.सी. समाजाचे राजकीय आरक्षण मिळण्यासाठी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्याबद्दल पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार गिरीश महाजन यांचा मुंबई येथे सत्कार केला.

आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण कायम ठेवण्याच्या संदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असून त्यासाठी न्यायालयात शिंदे – फडणवीस सरकारने भक्कमपणे बाजू मांडल्याबद्दल मुंबई येथे हा सत्कार करण्यात आला.

मागील काळात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सत्तेत आल्यानंतर ओ.बी.सी. समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्याचे आपले वचन पुर्ण केले असल्याने भारतीय जनता पार्टीचे पाचोरा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

Exit mobile version