Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायाधीश महिलेला वाढदिवसाच्या सदिच्छा देणारा वकील तुरुंगात !!

 

 

भोपाळ : वृत्तसंस्था । मध्य प्रदेशातील एका वकिलाला महिला न्यायाधीशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं चांगलंच महागात पडलं आहे. वकिलाची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

 

जामीन मिळावा यासाठी वकिलाने उच्च न्यायालयात याचिका केली आहे. वकिलाने ईमेलच्या माध्यमातून न्यायाधीशांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. यासाठी त्याने त्यांच्याच फेसबुक अकाऊंटवरुन फोटो डाऊनलोड केला होता. न्यायाधीशांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

 

९ फेब्रुवारीला रतलाम पोलिसांनी वकील विजयसिंग यादव यांना न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) मिथाली पाठक यांना २९ जानेवारीला ईमेल आणि वाढदिवसाचं कार्ड पाठवलं. विजयसिंग यांनी मिथाली पाठक यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन फोटो डाऊनलोड करत तो वाढदिवसाच्या कार्डसोबत जोडल्याचा आरोप आहे.

 

तक्ररीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, विजयसिंग यादव यांनी कोणतीही परवानगी न घेता न्यायाधीशांचा फोटो वापरला आणि त्यांच्या अधिकृत खात्यावर मेल पाठवला. विजयसिंग यादव फेसबुकवर न्यायाधीशांच्या मित्रांच्या यादीत नसल्याने अनधिकृतपणे फोटोचा वापर केल्याने त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गतही कारवाईची शक्यता आहे.

 

१३ फेब्रुवारीला विजयसिंग यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाने जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. यामुळे विजयसिंग यादव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यादव यांनी आपल्यावर अनावश्यक गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलं आहे. न्यायाधीशांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता असंही ते म्हणाले आहे. याशिवाय आपल्याला इंटरनेट आणि सोशल मीडियाची इतकी माहिती नसल्याचाही त्यांचा दावा आहे.

Exit mobile version