Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

न्यायव्यवस्थेवर टीका

मुंबई,लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – भाजपा नेत्यांनाच अटकेपासून दिलासा कसा मिळतो? असा प्रश्न उपस्थित करीत न्यायव्यवस्थेवर टीका केल्या प्रकरणी खा. संजय राऊत यांच्यासह अन्य व्यक्ती विरोधात ‘इंडियन बार असोसिएशन’ तर्फे अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘आयएनएस विक्रांत’ युध्द नौका निधी अपहारप्रकरणी भाजपचे किरीट सोमय्या यांच्या अटकेपासून मुबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. या निकालानंतर खा.संजय राऊत यांनी न्यायालयात भाजप नेत्यांनाच दिलासा कसा मिळतो, असा प्रश्न उपस्थित करीत न्यायव्यवस्थेवर टीका केली होती. न्यायव्यवस्थेवरच टीका केल्याप्रकरणी खा. संजय राऊत यांच्याविरोधात ‘इंडियन बार असोसिएशन’ तर्फे मुबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या

याचिकेत खा. राऊत यांच्या समवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी ‘सामना’च्या संपादक रश्मी ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे. या सर्वावर न्यायालयीन निर्णय प्रक्रियेवरच टीका केल्या प्रकरणी अवमान कारवाई करण्याची मागणी ‘इंडियन बार असोसिएशन’तर्फे करण्यात आली आहे.

मंत्रीपदी असलेले प्रतिवादी संपूर्ण न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याच्या मोहिमेत गुंतले असून न्यायालयाने दिलेले निकाल विरोधात गेल्याने आहेत. मुंबई न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांचे मनसुबे फसले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर टीका केली असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

Exit mobile version