Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी – पाटबंधारे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ६ लाखात फसवणूक झाल्याप्रकरणी बुधवारी शहर पोलिसांनी संशयिताला पोलीस ठाण्याच्या आवारातून अटक केली आहे. अकीबुल्लाह खान सैफुल्ला खान असे त्या संशयिताचे (रा. गेंदालालमिल) नाव आहे.

गेंदालाल मिल परिसरातील रहिवासी नजमुद्दीन काझी नईमोद्दीन काझी यांना पाटबंधारे खात्यात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अकीबुल्लाह खान सैफुल्ला खान, तसेच त्याचा भाऊ सज्जादउल्लाह खान व अ‍ॅड़ मजहर पठाण (रा़ उस्मानिया पार्क) यांनी सन २०१६ पासून ते २८ नोव्हेंबर २०१९ या दरम्यानात वेळोवेळी पैशांची मागणी केली़ असे एकूण ६ लाख रूपये नजमुद्दीन यांच्याकडून घेवून त्यांना बनावट करारनामा दिला़ अखेर हा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी तिघांकडे पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर ३१ डिसेंबर रोजी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखात फसवणूक केल्याकप्रकरणी नजमुद्दीन यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्या आला होता़ या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे करीत होते.

दरम्यान, बुधवारी पोलीस उपनिरिक्षक जगदीश मोरे यांनी शहर पोलीस ठाण्याच्या आवारातूनच संशयित अकीबुल्लाह खान याला अटक केली आहे़ तसेच इतर संशयितांचाही शोध पोलीस घेत आहेत.

Exit mobile version