Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीस आणावा : सभापती पवार यांचे आवाहन

धरणगाव, प्रतिनिधी । कृषि उत्पन्न बाजार समिती, धरणगावच्या फेडरेशनकडे कापुस विक्री करिता नोंदणी केलेल्या शेतकरी बांधवांनी ५ सप्टेंवरपर्यत विक्रीस घेऊन जावे अन्यथा बाजार समिती जबाबदार राहणार नाही असे सभापती सुनिल पवार यांनी कळविले आहे.

कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये फेडरेशनकरिता ज्या ज्या शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नांव नोंदणी केली आहे. व धरणगाव,एरंडोल तहसिलदार कार्यालय यांच्याकडून ज्या शेतक-यांकडे कापुस शिल्लक आहे अशा पंचनामे झालेल्या नोंदणी यादीतील शेतकरी बंधुनी दि. ५ सप्टेंबरपर्यंत कापुस विक्रीस आणण्याकरिता फोनव्दारे कापुस विक्रीकरिता आणने बाबतच्या सुचना बाजार समितीकडून देण्यात आलेल्या आहेत. परंतु, ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल बंद किंवा इतर कारणामुळे कापुस मोजमाप होणे बाकी आहे. अशा फेडरेशन नोंदणी यादीतील शेतकऱ्यांनी एफ.ए.क्यु. दर्जाचा कापुस विक्री करिता फेडरेशन चे कापुस खरेदी केंद्र धरणगाव येथे बुधवार ५ सप्टेंबरपर्यंत विक्रीस घेवून जावे न नेल्यास धरणगाव बाजार समिती जबाबदार राहणार नाही. या सुचनेची कापुस विक्री शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी. तसे आदेश महाराष्ट्र राज्य सहकारी कापुस उत्पादक पणन महासंघ मर्यादित विभागिय कार्यालय जळगाव यांच्यापत्रावरुन सभापती सुनिल पवार यांनी व सचिव श्री. तायडे यांनी कळविले आहे.

Exit mobile version