Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेहरू युवा केंद्राने २० गावात केली ‘एचआयव्ही एड्स’विषयी जनजागृती!

 

जळगाव, प्रतिनिधी ।  जिल्ह्यात एचआयव्ही एड्स दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील २० प्रमुख गावात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली.

केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागातर्फे दि.१ डिसेंबर २०२० जागतिक एचआयव्ही एड्स दिनापासून जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली होती. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मंडळ आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने २० खेड्यात पथनाट्ये सादर करून भित्तिचित्रे साकारण्यात आली. तसेच चित्रकला स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली होती. नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी जिल्हाभरात जनजागृती केली.  

‘या’गावात केले सादरीकरण

एचआयव्ही एड्सविषयी नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून बोरगाव, मंगरूळ, वाघडी, पिंपळगाव, पातोंडा, उंबरखेड, भादली, शिरसोली, धनपाडा, गंधाली, केऱ्हाळे, विवरे, निंबोळ, अट्रावल, साकळी, चोरवड, उचंदा, वाकडी, खडका, नाडगाव या गावात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली.

Exit mobile version