Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेहरू नगरातील व्यावसायिकाची कार लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरूनगरात राहणाऱ्या व्यवसायिकाची २ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. या संदर्भात बुधवारी ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव शहरातील नेहरूनगर हेमंत मिठाराम बारी (वय-४९) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे स्टील वर्क्स नावाची फॅक्टरी असून त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ सीएफ ०९७४) क्रमांकाची सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार आहे. ही कार ते त्यांच्या घरासमोर पार्क करत असतात. मंगळवारी ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घरासमोर हेमंत बारी यांनी कार पार्किंगला लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाख रुपये किमतीची कार चोरून नेली. हेमंत बारी यांची पत्नी सीमा बारी या बुधवारी ८ फेब्रुवारी रेाजी सकाळी ५ वाजता उठल्यानंतर कार जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर हेमंत बारी यांनी कारचा सर्वत्र शोध घेतला, परंतु कार कुठेही मिळून न आल्याने अखेर सकाळी १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अल्ताफ पठाण करीत आहे.

Exit mobile version