Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेहमीप्रमाणे रेल्वेगाड्या सुरु ठेवणार

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्व प्रवासी रेल्वे नेहमीप्रमाणे सुरु असतील असं स्पष्ट केलं आहे. रेल्वे मंत्रालयाने ट्विट करत माहिती दिली  घाबरण्याची किंवा अंदाज बांधण्याची कोणतीही गरज नसल्याचं म्हटलं आहे.

 

देशात पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्यांमध्ये नेमकी काय स्थिती आहे  काय उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्र्यांसोबतच तज्ञांसोबतही चर्चा करत आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध असताना दिल्लीत सहा दिवसांच्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. दरम्यान काही राज्यांनी परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांवरही निर्बंध आणले आहेत. अनेकांना प्रवासी रेल्वे सेवा सुरु राहणार की बंद होणार अशी चिंता सतावत आहे.

 

 

सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळले जातील असं स्पष्ट करताना रेल्वेने नागरिकांनी तिकीट कंफर्म असेल किंवा आरक्षण असेल तरच रेल्वे स्थानकावर यावं अशी विनंती केली आहे.

 

 

दरम्यान अनेक राज्यांनी रुग्णसंख्या वाढत असल्याने निर्बंध वाढवले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आल्याचं सांगत सोमवारी एका आठवड्यासाठी लॉकडाउन जाहीर केला. तर राजस्थानमध्येही दोन आठवड्यांचा लॉकडाउन लावण्यात आला आहे. गुजरात, उत्तर प्रदेश आणि तेलंगणात न्यायालयाने राज्य सरकारला लॉकडाउनसंबंधी विचार करण्यास सांगितलं आहे.

Exit mobile version