नेरी येथे अनमोल परिवाराचा अभिनव उपक्रम

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नेरी बु। येथील अनमोल मित्र बहुउद्देशीय संस्था संचलित अनमोल कोचिंग क्लासेस, अनमोल बेकरी, अनमोल चायनीज, अनमोल ग्राफिक्स,अनमोल ब्युटीपार्लर यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील प्रत्येक मंडळ अध्यक्ष किंवा सदस्य यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन अनमोल परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले.

 

 

नेरी बु। परिसरातील ७६  गणेश मित्र मंडळाचे एकजुट व एकत्रितपणे साजरा करीत असलेला गणेशोत्सव कौतुकास्पद मानून प्रत्येक मंडळ अध्यक्ष किंवा सदस्य यांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन अनमोल परिवाराच्या वतीने सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने  नेरी बु। येथील वाघूर गणेश मित्र मंडळ, जय भारत गणेश मित्र मंडळ, जय बजरंग गणेश मित्र मंडळ, महावीर गणेश मित्र मंडळ यांचा समावेश होता.  नेरी दिगर  येथील जय भवानी गणेश मित्र मंडळ, जय मल्हार गणेश मित्र मंडळ, नवशक्ती गणेश मित्र मंडळ, जय लेवा गणेश मित्र मंडळ,जोगेश्वरी गणेश मित्र मंडळ,शिवनेरी गणेश मित्र मंडळ यांचा समवेश होता. देवपिंप्री येथील शिवशक्ती गणेश मित्र मंडळ, जय शिवराय गणेश मित्र मंडळ, शिव छत्रपती गणेश मित्र मंडळ,  महर्षी वाल्मिकी गणेश मित्र मंडळ यांना सन्मानित करण्यात आले.

माळपिंप्री येथील विर शिवाजी गणेश मित्र मंडळ, राजमुद्रा गणेश प्रतिष्ठान, हिंगणा बु। येथील श्री गणेश मित्र मंडळ,रामदेव बाबा गणेश मित्र मंडळ, गाडेगाव  येथील एकता गणेश मित्र मंडळ यांचा सत्कार करण्यात आला. नेरी प्लॉट येथील  श्रीराम गणेश मित्र मंडळ, बाल गणेश मित्र मंडळ  तसेच करमाड येथील साथ मित्रांची गणेश मित्र मंडळ, स्वराज्य गृप गणेश मित्र मंडळ, पळासखेडे मिराचे  येथील विराट गणेश मित्र मंडळ, योद्धा गणेश मित्र मंडळ, एकदंत गणेश मित्र मंडळ, विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, बजरंग गणेश मित्र मंडळ यांना सन्मानित करण्यात आले. सवतखेडा येथील एकलव्य गणेश मित्र मंडळ, जय श्रीराम गणेश मित्र मंडळ, बेलदार गणेश मित्र मंडळ आणि  मोहाडी येथील श्रीराम तरुण मित्र मंडळ, बजरंग गणेश मित्र मंडळ,  छत्रपती संभाजी राजे गणेश मित्र मंडळ, नवयुवक गणेश मित्र मंडळ या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

तसेच, अनमोल परिवाराच्या नेरी बु। येथे गणेश मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत वारकरी पंथाला प्राधान्य दिले. टाळ, मृदुंगाच्या गजरात निघालेली मिरवणूक एक वेगळे पण दाखवून गेली. या मिरवणुकीत सोयगाव येथील ह.भ.प.रवि महाराज व संस्थेचे विद्यार्थी, नेरी गावातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनमोल परिवाराचे किशोर  खोडपे, विवेक कुमावत, गणेश पाटील, माधुरी कुमावत, पूनम खोडपे, शिवाजी वाघ सर, वैभव सर, ह.भ.प.अशोक महाराज, पवन वाघ, दिलीप मामा पाटील, सिताराम खोडपे, सुपडू वानखेडे, अमोल भावसार, सतीश पाटील, हर्षल चौधरी, राहुल वडनेरे, जागृती मॅडम,  रोकडे सर, नरेंद्र कुमावत, शुभम खोडपे, भास्कर मुजुमदार, पवन पाटील, विजय पाटील, गोपाल पाटील, ऋषिकेष पाटील,  संदीप हडप, गजानन पवार, मोहित यादव, उमेश यादव, राहिस यादव,अनमोल क्लासेसचे सर्व विद्यार्थी व परिवारातील सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content