नेरीनाका येथून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमी समोरून एकाची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी १० जानेवारी रोजी सायंकाळी उघडकीला आली. याबाबत मंगळवारी ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

भगुराम प्रभूदयाल कुमावत (वय-५८) रा. वर्षा कॉलनी, मोहाडीरोड जळगाव हे मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ बीवाय ४२९९) क्रमांकाची दुचाकी आहे.  सोमवारी १० जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते जळगाव शहरातील नेरीनाका स्मशानभूमीजवळ कामाच्या निमित्ताने आला होते.  त्यांनी दुचाकी स्मशानभूमीसमोरील मोकळ्या जागेवर पार्किंग करून लावली होती. सायंकाळी ५ वाजता काम आटपून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांची पार्किंगला लावलेली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी परिसरात दुचाकीचा शोध घेतला पण दुचाकी मिळाली नाही. भगुराम कुमावत यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मंगळवारी ११ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किरण पाठक करीत आहे.

Protected Content