Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई-कानपूर आणि पुणे-जबलपूर दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेनच्या फे-यांना मुदतवाढ

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी  – भुसावळ मध्य रेल्वे मार्गावर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे विभागातर्फे मुंबई -कानपूर – मुंबई आणि पुणे- जबलपूर – पुणे दरम्यान पूर्णत: आरक्षित साप्ताहिक अतिजलद विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई ते कानपूर आणि पुणे ते जबलपूर दरम्यान प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ०४१५२ लोकमान्य टिळक टर्मिनस – कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी २ एप्रिल ते १ ऑक्टोबर २०२२ पर्यंत चालवण्यात येईल. ०४१५१ कानपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत चालविण्यात येईल. ०२१३१ पुणे – जबलपूर साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी २८ मार्च ते २७ जून २०२२ पर्यंत तर ०२१३२ जबलपूर- पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष २७ मार्च ते २६ जून २०२२ पर्यंत चालवण्‍यात येईल.

या ट्रेन्सच्या वेळ, संरचना आणि थांबे यात कोणताही बदल होणार नाही.
साप्ताहिक विशेष ट्रेन क्र. ०४१५२ आणि पूर्ण आरक्षित स्पेशल ट्रेन क्र.०२१३१ च्या विस्तारित फे-यांची विशेष शुल्कासह आरक्षण बुकिंग बुधवार १६ मार्च २०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू करण्यात आले आहे.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा. प्रवासादरम्यान प्रवाशांनी स्वतासह इतरांच्या सुरक्षिततेसाठी संसर्ग नियमांचे पालन करावे असे आवाहत भुसावळ रेल्वे मंडळ विभागातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version