Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंगसाठी उदय महाजन यांची निवड

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोवा राज्यात होणाऱ्या  नॅशनल गेम्स वेटलिफ्टिंगसाठी स्पर्धेसाठी रावेर शहरातील उदय महाजन यांची निवड महाराष्ट्रासंघात झाली आहे. २५ऑक्टोंबर ते २९ ऑक्टोंबर दरम्यान ही स्पर्धा गोवा येथे होणार आहे.

 

गोवा येथे होणाऱ्या  37 व्या नॅशनल गेम्स मध्ये वेटलिफ्टिंग या क्रीडा स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग  असोसिएशन चां खेळाडू उदय अनिल महाजन यांची 55 किलो वजनी गटात  महाराष्ट्राच्या संघात निवड झालेली आहे. उदय महाजन यांनी  तामिळनाडू नगरकॉएल येथे 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत केलेल्या कामगिरीच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली. उदय महाजन हे रावेर येथील रहिवाशी असून त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके पटकावली आहे, त्याच्या या निवडी मुळे रावेर शहरातील क्रीडा प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

 

सदर खेळाडू यांच्या या यश्याबद्दल जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश मुजुमदार सर, प्रदीप मिसर्  संजय मीसार, प्रकाश बेलासकर, राजेश शिंदे, आमोद महाजन, यशवंत महाजन, योगेश महाजन  यांनी त्यांचे अभिनंदन केले. उदय महाजन हे प्रतिभावंत खेळाडू असून भविष्यात त्यांचे कडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकाची अपेक्षा आहे, असे  प्रशिक्षक योगेश महाजन यांनी सांगितले.

Exit mobile version